व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेतं

मुंबई |काही दिवसांपूर्वी मुंबईचे व्यापारी राजेश्वर उदानी यांची हत्या झाली होती. याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारला पोलिसांनी अटक केली आहे.

घाटकोपरमधील दागिन्याचे व्यापारी उदानी यांचा मृतदेह पनवेलच्या जंगलात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

उदानी हे 28 नोव्हेंबरला बेपत्ता झाले होते. 4 डिसेंबरला त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते.

दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीही सचिन पवार याची चौकशी केली होती. तसेच याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची पोलीस चौकशी करत असल्याची माहिती मिळतेय.

महत्वाच्या बातम्या-

-“त्यावेळी गडकरी एवढंच बोलले… मोदी घरी बोलावून आपला अपमान करतात”

सर्जिकल स्ट्राईकचं नेत्तृत्व करणारे जनरल म्हणतात; “ढिंढोरा पिटून काहीच फायदा होणार नाही”

-विराट कोहलीनं केला विक्रम ; दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश

-ही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं टेन्शन ?

-…म्हणून गिरीश महाजनांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करा!