बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राजने नव्या अ‍ॅपसाठी सई ताम्हणकरलासुद्धा…’; पॉर्नोग्राफी केसमध्ये गहनाचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि नामांकित उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म बनवणे आणि त्या ऑनलाईन प्रदर्शित करणे हा आरोप करण्यात आला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ देखील अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून गहनाने याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच आता गहनाने मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव घेत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

राज कुंद्राच्या नव्या अ‍ॅपसाठी सई ताम्हणकरला देखील  विचारण्यात आलं होतं, असा दावा गहनाने केला आहे. गहनाच्या या दाव्यानंतर चित्रपट सृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. नुकतंच गहनाने माध्यमांशी संवाद साधताना हा धक्कादायक खुलासा केला आहे.

राज कुंद्राला अटक होण्यापूर्वी आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो. त्यावेळी मला त्याने त्याच्या ‘बॅलिफेम’ अ‍ॅपबद्दल सांगितलं होतं. या अ‍ॅपमध्ये कोणताही अश्लील किंवा बोल्ड मजकूर नसणार होता. या अ‍ॅपवरील चित्रपटासाठी सई ताम्हणकरला विचारण्यात आलं होतं. तसेच राजची मेहुणी  शमिता शेट्टी हिला देखील विचारण्यात आलं होतं, असं गहनाने म्हटलं आहे.

दरम्यान, गहनाने राज कुंद्राचं समर्थन करणारा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, आधी तुम्ही ते व्हिडीओ बघा आणि मग ठरवा व्हिडीओ अश्लील आहेत की नाही. 18 वर्षांवरील सर्व लोक समजूतदार आहेत. तसेच ते अश्लील आणि एरोटिकामधील फरक समजू शकतात. कोणताच व्हिडीओ अश्लील नसून सामान्य बोल्ड आहे. उगाच काही लोकांना टार्गेट केलं जातंय.

थोडक्यात बातम्या – 

“‘मुख्यमंत्री मंत्रालयात गेले’ ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत”

मोठी बातमी! शाळेच्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्रात पावसाचं रौद्र रुप! वरंध्याच्या घाटात गेल्या 24 तासांत 30 ठिकाणी दरडी कोसळल्या

“सतत पाऊस कोसळणाऱ्या भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी”

“आम्ही पूरग्रस्त भागात बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More