Top News देश

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप

नवी दिल्ली | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर मुंबईतील एका तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमवण्यासाठी आलेल्या एक मुलीने कथित गंभीर आरोप केला आहे.

मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 5 सप्टेंबला 2013 साली माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मला ठार मारण्याची धमकी दिली असल्याचं  तरूणीनं म्हटलं आहे. या घटनेच्या 45 दिवसानंतर मी मुंबईतील  मेट्रोपोलिटन कोर्टात या घटनेची तक्रार केली होती. मात्र 9 दिवसांनतर तक्रार पुन्हा माघारी घेतली होती.

संबंधित तरूणीचं 8 डिसेंबरला 2020 ला एक पत्र सोशल माध्यमावर व्हायरल झालं आहे. त्या पत्रात वांद्रे पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, झारखंडमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील

महाविकासआघाडीतील अंतर्गत पक्षांतरावर छगन भुजबळ म्हणाले…

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या