बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मानले महाराष्ट्राचे आभार!

मुंबई | कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना, कामगार आणि मजुरांना सर्वतोपरी मदत देण्याचं काम राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारच्या या कामाबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

हातावर पोट असलेल्या मुंबईतील हजारो मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपापल्या राज्यात जाण्यासाठी या नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशा परिस्थितीत प्रवास करणं धोकादायक असल्यानं राज्य सरकारनं त्यांना इथंच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्यासाठी शेकडो निवारा केंद्रांची सोय केली असून त्यांना जेवणही पुरवलं जात आहे.

झारखंडच्या गरजू नागरिकांना अशीच मदत सुरू ठेवण्याची विनंती हेमंत सोरेन यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही सोरेन यांच्या या ट्विटला तात्काळ प्रतिसाद दिला.

तुम्ही निश्चिंत राहा. झारखंडमधील आमच्या बांधवांना आम्ही अवश्य मदत देऊ. ते आमचं कर्तव्यच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या भूमिकेचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

 

 

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

 

ट्रेंडिंग बातम्या-

भारतातील मशिदी बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

“स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडलेले”

महत्वाच्या बातम्या-

हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

आता तरी सुधरा राव, चीनमध्ये पुन्हा कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ मांस विक्री सुरू!

इस्लामपूरमध्ये आढळलेले कोरोनाचे रुग्ण मोदींवर टीका केल्याची शिक्षा- अवधूत वाघ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More