पुणे महाराष्ट्र

ऐतिहासिक रायगडाच्या पायथ्याशी ‘जिजाऊ सृष्टी’ साकारली जाणार

पुणे | रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाड येथील जिजाऊ वाड्याच्या परिसरातील 88 एकरांत ‘जिजाऊ सृष्टी’ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

देशातील सर्व गड-किल्ल्यांसाठी रोल मॉडेल असलेल्या रायगडच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन आणि विकासासाठी 606 कोटींच्या आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगडावर पार पडला होता.  त्यामुळे रायगडाला देशाच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. 

दरम्यान, शिवकालीन ऐतिहासिक सुंदरतेचे आणि मराठा स्थापत्यशैलीतून जिजाऊ सृष्टी साकारण्यात येणार आहे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

-ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा?

-अत्यंत घाणेरड्या पातळीवर जाऊन मोदी समर्थकांची प्रियांका गांधींवर टीका

-“मोदी माझे ज्युनिअर, पण अहंकार कशाला दुखवायचा म्हणून ‘सर’ म्हणायचो” 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या