डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका; त्या पत्रकाराचा पास परत देण्याचे आदेश

फोटो-ट्विटर/@dougmillsnyt

वॉशिंग्टन | अमेरिकन न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे. सीएनएनचे पत्रकार जिम अकोस्टा यांना व्हाईट हाऊसचा पास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नोव्हेंबरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जिम अकोस्टांच्या प्रश्नाचं उत्तर देणं डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळलं होतं. तसेच त्यांच्याकडून माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला होता. 

या प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. व्हाईट हाऊसने अकोस्टा यांना प्रेस पास रद्द केला होता. 

सीएनएनने याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने व्हाईट हाऊसच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे. अकोस्टांचा प्रेस पास पुन्हा देण्यात आला आहे. 

तो व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-माज केला पण वाया गेला!; विराट कोहलीला प्रशासकीय समितीची तंबी

-आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घरोघरी जाऊन सांगणार नोटाबंदीचे फायदे

-बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन; वंदन करण्यासाठी शिवाजी पार्कवर गर्दी

-राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’; 1 जानेवारीपासून पगारात घसघशीत वाढ?

-चंद्राबाबूंनंतर आता ममता बॅनर्जींकडून मोदी सरकारला मोठा झटका