खेळ

आता भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू म्हणतोय; मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन!

मुंबई | मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन!, हे वाक्य महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी प्रचार करताना आपल्या भाषणात म्हटलं होतं. मात्र, त्या वाक्यावरून ते सगळीकडे ट्रोल झालेेले आपल्याला पाहायला मिळाले. आता असंच काहीतरी मराठमोळा क्रिकेटपटू आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं म्हटलं आहे.

मला कसोटी सामन्यांमध्ये चांगला खेळ करायचा आहे, धावा काढणं सुरु ठेवायचं आहे आणि कसोटी सामन्यात माझं संघाच्या विजयात योगदान असेल तर मी वन-डे संघात नक्कीच पुनरागमन करेन, असं अजिंक्य रहाणेनं म्हटलं आहे. बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याआधी रहाणे पत्रकारांशी बोलत होता. 

अजिंक्य रहाणेने मोठ्या कालावधीनंतर आपला हरवलेला फॉर्म पुन्हा एकदा मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी खराब कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या अजिंक्यने विंडीज दौऱ्यातून चांगलं पुनरागमन केलं.

2016 साली वेस्ट इंडिजविरुद्ध अजिंक्य रहाणे आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. तर गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्यनं अखेरचा वन-डे सामना खेळला. यानंतर त्याला भारतीय संघात आपलं स्थान टिकवता आलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात अजिंक्य वन-डे संघात कधी पुनरागमन करतोय याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या