खेळ

“दुधात पडलेल्या माशीप्रमाणे अजिंक्य रहाणेला वन-डे मधून बाहेर काढलं”

मुंबई | भारतीय टेस्ट टीमचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे हा त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. टेस्टमध्ये मधल्या फळीत खेळणारा अजिंक्य हा राहुल द्रविडप्रमाणे भारताचा आधारस्तंभ मानला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्यला वन-डे मध्ये स्थान देण्यात येत नाहीये. याचबाबत भारतीय टीमचा माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी परखड शब्दात आपलं मत मांडलंय.

अजिंक्य चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याची आकडेवारी चांगली होती. तुम्ही सातत्याने चांगली कामगिरी करताय आणि तरीही तुम्हाला टीममध्ये संधी न मिळणं अन्यायकारक आहे. अजिंक्यला अचानक वन-डे टीममधून बाहेर काढण्यात आलं. ज्याप्रमाणे आपण दुधात पडलेली माशी बाहेर काढतो त्याप्रमाणे अजिंक्यला वागणूक देण्यात आली. माझ्या मते अजिंक्यवर हा अन्याय आहे, अशा शब्दांत आकाश चोप्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय टीम आजही पारंपरिक पद्धतीने खेळते. इंग्लंडसारखं आपण फटकेबाजी करुन प्रत्येक सामन्यात 350 धावा करण्याचा प्रयत्न करत नाही. पहिल्यांदा मैदानावर स्थिरावून, भागीदारी करुन भारतीय टीम 300 धावांचं लक्ष्य पार करतो. मग या परिस्थितीत अजिंक्य रहाणे नक्कीच फायदेशीर असल्याचं आकाश चोप्रा म्हणाले.

चांगली कामगिरी केल्यानंतरही अजिंक्यला टीमबाहेर काढणं माझ्या दृष्टीने योग्य नाही. भारतीय टीममध्ये ही गोष्ट योग्य केली जात नाहीये. 2018 पर्यंत तो चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे माझ्या मते अजिंक्यला पुन्हा एकदा टीममध्ये संधी द्यायला हवी, असं आकाश म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं -राहुल गांधी

जिओमीट हुबेहुब झूमसारखं; झूम जिओला कोर्टात खेचणार?

पुण्यात पुन्हा कडक लॉकडाउन, अजित पवारांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या