तंत्रज्ञान

दीड जीबी पुरत नसणाऱ्यांसाठी आली ‘ही’ खास ऑफर…!

मुंबई | सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना दिवसाला दीड जीबी डेटा देत आहेत. बऱ्याच ग्राहकांना हा डेटा पुरत नसल्याने त्यांची पुढे तारांबळ उडत आहे. अशा ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपन्यांनी काही एक्स्ट्रा डेटाचे प्लॅन उपलब्ध करुन ग्राहकांना दिलासा दिला आहेत.

जिओने नवीन प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना 349 रुपयांचा रिचार्ज असून 28 दिवसांच्या मुदतीसह दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध करुन दिला आहे. यासोबतच 100 मॅसेज दरदिवसाला आणि जिओ टू जिओ फ्री कॉलिंग त्यासोबतच 1 हजार मिनिटे इतर नेटवर्कसाठी देण्यात आली आहे.

जिओप्रमाणे एअरटेलनेही 3 जीबी डेटाचा प्लॅन लाँच केला आहे. 399 रुपयांना 28 दिवसांसाठी 3 जीबी डेटा दररोज देण्यात येणार आहे. तर 100 मॅसेज दिवसाला असून सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आली आहे.

व्होडाफोनचा 3 जीबी डेटाचा प्लॅन अजून तरी ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेला नाही. सध्या व्होडाफोनचा 299 रुपयांना 28 दिवसांची मुदत देत 2 जीबी डेटा देत आहे. तर यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगही मिळत आहे. असाच प्लॅन 449 रुपयांना 56 दिवसासाठीही आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या