Loading...

जिओकडून नवीन टॉक टाईम ऑफरची घोषणा!

मुंबई |  जिओने फ्री टॉक टाईम सेवा बंद केली असून त्या बदल्यात 6 पैसे प्रति मिनिट पैसे आकारले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक जिओ युजर्स नाराज झाले होते. त्यामुळे रिलायन्सने नवीन टॉक टाईम ऑफर युजर्ससाठी सुरु केली आहे.

फ्री टॉक टाईम सेवा बंद केल्यामुळे युजर्सच्या संख्येत घट होऊ नये यासाठी कंपनीने नवी ऑफर सुरु केली आहे. ही वन टाईम ऑफर आहे. घोषणा केल्यानंतर 7 दिवसांत ही ऑफर उपलब्ध होईल. पहिल्यांदा रिचार्ज केल्यावर ग्राहकांना 30 मिनिटाचा फ्री टॉक टाईम मिळेल.

Loading...

9 ऑक्टोबरला रिलायन्स जिओकडून मोफत कॉलिंग सेवेवर आता पैसे आकारले जातील अशी घोषणा करण्यात आली होती. रिलायन्सच्या या निर्णयानंतर युजर्समध्ये एकच गोंधळ उडाला होता. अनेक युजर्सने ट्विटरवर या निर्णयाविरोधात टीका केली. तर अनेकांनी नंबर पोर्ट करण्याची धमकीही दिल्याचं दिसून आलं होतं.

दरम्यान, रिलायन्सने या निर्णयाची घोषणा केल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांनी युजर्सला मोफत कॉलिंग सेवा देण्याचा प्रयत्न केला. तसेच जिओचा ग्राहक आपल्याकडे कसा आकर्षित केला जाईल याचा प्रयत्नही केला जात आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...