Top News तंत्रज्ञान

इंटरनेट क्षेत्रात जिओचा नवा धमाका; ५ सप्टेंबरपासून जिओ फायबर सुरु

Loading...

मुंबई | रिलायन्सच्या बहुप्रतिक्षीत जिओ गिगाफायबर योजनेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जिओ लॉंचिंगच्या तिसऱ्या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या ५ सप्टेंबरपासून जिओ गिगाफायबर लाँच होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुंबईत पार पडलेल्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानींनी ही घोषणा केली.

‘प्रकाशाच्या वेगाचा स्पीड’ अशा शब्दात मुकेश अंबानी यांनी या योजनेचं वैशिष्ट्य सांगितलं. जिओ गिगाफायबरचे प्लॅन ७०० रुपयांपासून सुरु होणार असून ते १० हजार रुपयांपर्यंत असणार आहेत.  दरात मिळणार आहेत.  १०० एमबीपीएस पासून १  जीबीपीएसपर्यंतचा अफाट स्पीड ग्राहकांना मिळणार आहे.

Loading...

१६०० शहरांमधून १५ दशलक्ष लोकांनी गिगाफायबरची नोंदणी केली होती. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केलं होतं. यामध्ये अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

जिओफायबरची वैशिष्ट्ये?-

Loading...

-जिओफायबरवर मिळणार केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि नवे सिनेमे

-जिओ फायबरमध्ये देशांतर्गत व्हॉईस कॉल मोफत मिळणार आहेत. चार प्रकारात उपलब्ध असून यामधून 500 रुपयांच्या प्लॅनवर अमेरिेका आणि कॅनडाला अनलिमिटेड कॉल करता येतील

-ज्या दिवशी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार त्याच दिवशी तो प्रिमिअम ग्राहकांना पाहता येणार

-जिओची ही सिनेमाची फर्स्ट डे फर्स्ट शो योजना २०२० च्या मध्यापासून सुरू होणार

Loading...

-५० लाख घरांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू आहे जिओ गिगाफायबर

-१ अब्ज घरांना कनेक्ट करण्याचं रिलायन्सचं लक्ष्य

महत्वाच्या बातम्या-

-रिलायन्स जिओचा आता डीटीएच क्षेत्रात धमाका; केली मोठी घोषणा

-रयतेच्या सेवेसाठी 5 कोटी खर्च करणार; संभाजीराजेंचा संकल्प

-“कलम 370 हा म्हणजे राजकारणाचा नाही तर राष्ट्रहिताचा मुद्दा आहे”

-#EidAlAdha | ईदचा उत्साह; देशभरात नमाज अदा

-“मला युद्ध आवडत नाही, पण मी देशभक्त आहे”

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या