बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक रिलायन्समध्ये होणार!

मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमेटेड समूहाच्या मुंबईत झालेल्या वार्षीक बैठकीत मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या भविष्यातील वाटचालींविषयी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देशात सर्वाधिक मोठी परकीय गुतंवणूक होणार असल्याचं यावेळी जाहिर करण्यात आलं आहे. ही केवळ रिलायन्स नव्हे तर देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असेल, असं मुकेश यांनी सांगितलं आहे.

रिलायन्स ने सौदी अराम्को या कंपनीशी खनिज तेलापासून रसायने तयार करण्याच्या क्षेत्रात भागीदारीचा करार केला आहे. त्यानुसार सौदी अराम्को 75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून रिलायन्समधील 20 टक्के  समभाग विकत घेणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही भारतातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी झाल्याचं यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं- विराट कोहली

-इंटरनेट क्षेत्रात जिओचा नवा धमाका; ५ सप्टेंबरपासून जिओ फायबर सुरु

-रिलायन्स जिओचा आता डीटीएच क्षेत्रात धमाका; केली मोठी घोषणा

-रयतेच्या सेवेसाठी 5 कोटी खर्च करणार; संभाजीराजेंचा संकल्प

-“कलम 370 हा म्हणजे राजकारणाचा नाही तर राष्ट्रहिताचा मुद्दा आहे”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More