तंत्रज्ञान

जिओचा दिवाळी धमाका; ‘हे’ ऑल इन वन प्लॅन्स लाँच

मुंबई | रिलायन्स जिओने सोमवारी नवीन ऑल इन वन प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये युजर्सना आधीपेक्षा जास्त डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत. जिओने तीन नवीन प्लॅन सुरू केले आहेत. यामध्ये 222, 333, 444 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

सर्वात स्वस्त असलेल्या 222 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2 जीबी डेटा आणि जिओ टू जिओ नेटवर्क अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर जिओवरून इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1 हजार मिनिट मिळतील.

ऑल इन वन प्लॅनमध्ये 333 रुपयांतसुद्धा तेच फायदे मिळतील जे 222 रुपयांत मिळतात. त्यामध्ये एक महिन्याऐवजी दोन महिने मुदत असणार आहे. तर 444 रुपयांच्या प्लॅनवर युजर्सला तीन महिन्याची मुदत मिळेल.

दरम्यान, नवा प्लॅन हा जुन्या प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहे. सध्या 2जीबी डेटाचा तीन महिन्यांसाठीचा प्लॅन 448 रूपये आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या