बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

JIO ग्राहकांसाठी खुशखबर! नववर्षाआधी आणला ‘हा’ भन्नाट प्लॅन

मुंबई | सध्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जचे रेट वाढवले आहेत. जुन्या प्लॅनमध्ये बदल करून नवीन रेटमध्ये ग्राहकांना रिचार्ज घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीतही रिलायन्स जिओने (Reliance Jio) मात्र आपल्या रिचार्जचे रेट कमी ठेवले आहेत. त्यातच आता जिओने (Jio) आपल्या ग्राहकांसाठी नविन वर्षाची एक ऑफर देखील आणली आहे.

जिओने ग्राहकांना वार्षिक 20,545 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर ऑफर दिली आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स, दिवसाला 100 मेसेज, आणि प्रति दिवस 1.5 जी बी डाटा या सुविधा आहेत. या प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. मात्र, आता ग्राहकांना या प्लॅनमध्ये 29 दिवसांची अतिरिक्ती वैधता मोफत मिळणार आहे. त्यामुळे या प्लॅनची वैधता 365 दिवसांची होणार आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ ॲपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. ज्यामध्ये जिओ टी व्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरीटी आणि जिओ क्लाऊड यांचा समावेश आहे. मात्र, ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 2 जानेवारी पर्यंत ग्राहकांना रिचार्ज करावा लागणार आहे.

दरम्यान,  जिओनं जेव्हापासून या क्षेत्रात प्रवेश केला आहे, तेव्हापासून इतर मोठमोठ्या कंपन्यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला आहे. त्यात सर्वात वाईट हाल वोडाफोन-आयडियाचे झालेले पहायला मिळत आहे. दोन कंपन्या एकत्र आल्यानंतरही त्यांच्या अ़डचणी कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातचं आता जिओने नवीन ऑफर आणल्याने इतर कंपन्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांची परिस्थिती चोरासारखी झालीये”

मोठी बातमी! पनवेलमधील फार्महाऊसवर अभिनेता सलमान खानला सर्पदंश

Omicron ने चिंता वाढवली; दिल्लीतून धक्कादायक माहिती समोर

अखेर प्रतिक्षा संपली! आता 15 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस

‘Omicronचं संकट वाढलंय, सावधान रहे सतर्क रहे’; मोदींचा देशवासीयांनी सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More