तंत्रज्ञान

दरवाढीनंतर जिओने केली ‘या’ नव्या प्लॅन्सची घोषणा!

मुंबई | एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने नवे दर लागू केल्यानंतर आता रिलायन्स जिओनेही नवे टॅरिफ प्लॅन्स लाँच केले आहेत. 6 डिसेंबर म्हणजे उद्यापासून रिलायन्स जिओची दरवाढ लागू होत आहे.

जिओने 199 ते 2199 रुपयांदरम्यान विविध प्लॅन सादर केले आहेत. यात 28 दिवसांच्या वैधतेपासून एक वर्षापर्यंत वैधता असलेल्या प्लॅन्सचा समावेश आहे.

199 रूपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं 28 दिवसांसाठी देण्यात आली आहेत. तसेच 249 रूपयांच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी  1000 मिनिटं 28 दिवसांसाठी मिळणार आहे. तर 444 रूपयांच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा आणि 2000 मिनिटे अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी मिळणार आहेत.

दरम्यान, रिलायन्स जिओने दूरसंचार सेवेच्या दरांमध्ये वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर आता रिलायन्स जिओ फायबर युजर्सनाही दणका बसला आहे. जिओ फायबर युजर्सना आता ‘फ्री ब्रॉडबँड’ सेवा मिळणार नाही. कंपनीने आपल्या ब्रॉडबँड सेवेसाठी दर आकारण्यास सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या