Jio launches VoNR service l देशातील आघाडीची (Leading) टेलिकॉम कंपनी (Telecom Company) रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन सुविधा (Facilities) आणत असते. या नवीन आणि अपडेटेड (Updated) सुविधांमुळे युजर्सना प्रचंड फायदा होत आहे. आता कंपनीने आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवीन सेवा सुरू केली आहे.
जिओकडून ‘VoNR’ सेवा सुरू; कॉलिंग (Calling) होणार अधिक चांगले :
रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘व्हॉईस ओव्हर न्यू रेडिओ’ (Voice over New Radio – VoNR) ही सेवा घेऊन येणार आहे. VoNR हे एक प्रगत कॉलिंग तंत्रज्ञान (Advanced Calling Technology) असून, अशी सेवा सुरू करणारी जिओ ही पहिलीच कंपनी ठरणार आहे. हे तंत्रज्ञान बॅकग्राऊंड आवाज (Background Noise) कमी करून एचडी ऑडिओ (HD Audio) प्रदान करते. त्यामुळे कॉलवर (Call) बोलताना युजर्सना स्पष्ट आवाज (Clear Voice) ऐकू येतो.
या नवीन सेवेमुळे आवाज गुणवत्ता (Voice Quality) सुधारते, कमी लेटन्सी (Low Latency) मिळते आणि संभाषणाचा (Communication) दर्जा सुधारतो. तसेच, यामुळे नेटवर्क कार्यक्षमता (Network Efficiency) देखील सुधारते.
Jio launches VoNR service l ‘VoNR’ आणि ‘VoLTE’ मधील फरक
आतापर्यंत एअरटेल, व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) आणि जिओ यांसारख्या कंपन्या कॉलिंगसाठी ‘व्हॉईस ओव्हर एलटीई’ (Voice over LTE – VoLTE) या तंत्रज्ञानाचा वापर करत होत्या. हे तंत्रज्ञान 4G नेटवर्कमध्ये (4G Network) वापरले जाते, तर VoNR हे 5G नेटवर्कचे (5G Network) तंत्रज्ञान आहे.
VoNR हे 5G नेटवर्क वापरून उत्तम व्हॉईस क्वालिटी, कमी लेटन्सी आणि चांगली नेटवर्क कार्यक्षमता प्रदान करते. VoNR खास 5G नेटवर्कवर वापरण्यासाठी डिझाइन (Design) करण्यात आले आहे. जिओच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे युजर्सना आता कॉलवर बोलताना अधिक चांगला आवाज ऐकू येणार आहे.
दिल्ली (Delhi), मुंबईत (Mumbai) सुरुवात; देशभरात लवकरच सेवा उपलब्ध होणार :
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार (Media Reports), जिओने दिल्ली आणि मुंबईमध्ये ही सेवा सुरू केली आहे. देशातील इतर काही भागांतही याची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. लवकरच कंपनी देशभरातील युजर्ससाठी ही नवीन सेवा उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकारे, पुन्हा एकदा जिओने एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले आहे. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाकडून (Vi) या तंत्रज्ञानाच्या उपयोजनाबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे, VoNR हे 5G नेटवर्कचे तंत्रज्ञान वापरणारी जिओ ही पहिलीच कंपनी असल्याचं मानलं जात आहे.
Title : Jio launches VoNR service for better calling experience, leaving Airtel and Vi behind
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी समोर; अर्जुन कपूर, भूमी पेडणेकरच्या शूटिंग दरम्यान दुर्घटना
आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही!
वजन कमी करण्याचा सोपा मार्ग; ‘या’ 3 ट्रिक्स वापरून घटवा झटपट वजन
धनंजय मुंडेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, तटकरे तोडांवर पडले
महायुती सरकारचा लाडक्या बहिणींना पहिला मोठा धक्का!