Top News

जिओची भन्नाट ऑफर; 100 जीबी डेटा मिळणार मोफत

मुंबई | रिलायन्स जिओच्या नेटवर्कवरून दुसऱ्या कोणत्याही नेटवर्कवर संपर्क करण्यासाठी ग्राहकांकडून जिओने शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकाला अन्य नेटवर्कवर संपर्क साधण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारला जात आहे. याची भरपाई म्हणून जिओने ग्राहकासांठी खास ऑफर आणली आहे.

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 6 वेगवेगळी टॉप-अप व्हाऊचर उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये 10 रुपये, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपयांचे टॉप-अप व्हाऊचर ग्राहकांना मिळणार आहेत.

20 रुपयांचे रिचार्ज केल्यावर 2 जीबी डेटा, 50 रुपयांच्या रिचार्जवर 5 जीबी डेटा, 100 रुपयांवर 10 जीबी डेटा, 500 रुपयांवर 50 जीबी डेटा आणि 1 हजार रुपयांच्या रिचार्जवर 100 जीबी डेटा मोफत मिळू शकेल.

दरम्यान, टेलिकाॅम क्षेतात मक्तेदारी निर्माण केलेल्या जिओने आता ग्राहकांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या ग्राहकांना खूष करण्यासाठी जीओ नवनवीन ऑफर घेऊन येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या