बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना सर्टिफाईड गुंडाचा पक्ष, राऊतांच्या वक्तव्यावर अजितदादांनी करुन दिली ‘ती’ आठवण

जालना | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी असल्याचं म्हटलं होतं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणी काहीही बोलतं. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, अशी आठवण करुन देताना कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं, असं सांगत अजितदादांनी एकप्रकारे राऊतांना आरसा दाखवला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणूका ‘या’ महिन्यात लागण्याची शक्यता!

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

12 तास काम करूनही पगार मिळणार कमी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या तज्ज्ञांनी भारताला दिले ‘हे’ 8 महत्वाचे सल्ले!

आई बापाच्या कष्टाचं चीज, पंढरपुरातील मजूराच्या पोराची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More