शहापूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेेेंद्र आव्हाड शहापूर दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आदिवासी पाड्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे.
या नेत्याला काय म्हणावं कुडाची झोपडी…आदिवासी मावशी ने केलेला स्वयपाक अन् तांदळाची भाकरी … भाजलेला कोंबड्याच्या रस्सा .. कनटोरल्याची भाजी….संस्मरणीय दिवस, अशा शब्दात आव्हाडांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
शहापूर तालुक्यातील भगवान सांबरे रूग्णालय संचलित हेमंत सुपर कर्करोग स्पेशलिस्ट रूग्णालयाचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर पवार आणि आव्हाडांनी दोऱ्याचा पाडा येथील रामचंद्र खोडके यांच्या घरी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जेवण केलं.
दरम्यान, आदिवासी कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी आदिवासी पाड्यावर जेवण करत-करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या नेत्याला काय म्हणावे …
कुडाची झोपडी .. आदिवासी मावशी ने केलेला स्वयपाक .. तांदळाची भाकरी … भाजलेला कोंबड्याच्या रस्सा … कनटोरल्याची भाजी …
आणि साहेब जेवता आहेत … संस्मरणीय दिवस .. 30/1/2020
तालुका शहापूर दोर्याचा पाडा pic.twitter.com/P9VYL8PyKh— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 31, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
आता मोबाईलसारखं वीजेसाठीही आधीच रिचार्ज करावं लागणार!
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी नव्या योजनांची नांदी
महत्वाच्या बातम्या-
सरकारचा नवा टॅक्स स्लॅब; तुमच्या इतक्या वार्षिक उत्पन्नावर लागणार इतका टॅक्स!
आता चिंता नाही! बॅंक डुबली तर मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे
मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘नवी बाटली जुनी दारू’; काँग्रेसची टीका
Comments are closed.