मुंबई | महाविकास आघाडीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
अल्लाह को मालूम था 2011 में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में 2019 में कब्रस्तान बना, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. कोरोनाचं संकट येणार हे अल्लाहला 2011 सालीच दिसलं म्हणून 2019 ला कब्रस्तान बनलं, असं अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचं राजकारण आव्हाड यांना करायचं आहे का?, असा सवाल विरोधक विचारत आहेत.
आव्हाडांच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवलं आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री एक ट्वीट केलं होत. माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे, अशा आशयाचं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
संतापजनक! शौचासाठी शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
विना मास्क बुलेट सवारी करणं पडली महागात; नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल
गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!
पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!
“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”