बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शहा म्हणतात लोकशाहीची गळचेपी होते; विक्रम गोखले शब्दाला जागणारे; जितेंद्र आव्हाडांचा टोला

मुंबई | देशात लोकशाहीची गळचेपी होत आहे असं म्हणणाऱ्यांच्या मुस्काटात द्यावी, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची गळचेपी होतं आहे, असं भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणतात. विक्रम गोखले आपल्या शब्दाला जागणारे आहेत, असं म्हणत त्यांनी गोखलेंना टोला लगावला आहे.

विक्रम गोंखलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. विविध स्तरांतून त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आव्हाडांनीही गोखलेंवर टीका केली होती.

दरम्यान, पश्चिम बंगाममध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये वाद सुरु आहे. याचा संदर्भ देत अमित शहांनी बंगालमध्ये लोकशाहीची गळचेपी होत आहे, असं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-“देशाचा पंतप्रधान होण्याची पात्रता राहुल गांधींमध्ये नाही”

-भारतीय संघात ‘या’ खेळाडूची जागा कोणीच घेऊ शकत नाही- विरेंद्र सेहवाग

-ममता बॅनर्जींचं वागणं सद्दाम हुसैनसारखं; विवेक ओबेराॅयचे टीकास्त्र

-“मी भाजप सोडल्यामुळे अडवाणींचे डोळे पाणावले”

-राज ठाकरे यांच्याप्रमाणे तृणमूलही म्हणणार ‘लाव रे तो व्हीडिओ’!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More