सकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा!

मुंबई | दारूची दुकानं सकाळी 10 ऐवजी 8 वाजता उघडली जाणार आहेत. याबाबत गृहविभागाने जीआर काढला आहे. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

सरकारचा नवीन फंडा सकाळी 8 लाच दारू मिळणार. सकाळीच दारू प्या, मस्त झिंगा, चढली की पडा, सरकार आहे की नाही, काही करतं की नाही ह्याची आठवणच होताच कामा नाही, असा शब्दात आव्हाडांनी ट्वीट करत सरकारवर हल्ला चढवला आहे.

दरम्यान, दारूची दुकानं सकाळी ग्रामीण भागात सकाळी 10 ते रात्री 10, तर शहरी भागात दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत उघडी ठेवायला परवानगी होती. मात्र आता दोन्ही ठिकाणी सकाळी 8 ते रात्री 10 उघडी ठेवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलाय. मात्र सरकारच्या या निर्णयावर सोशल मिडियावरून टीका केली जातेय.

महत्त्वाच्या बातम्या-

-…आणि मी ‘स्वरराज’चा ‘राज’ झालो; राज ठाकरेंनी उलगडलं नावाचं गुपित

-माणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे

-भारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी

-दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार!

-तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी