मुंबई | गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटकी होता, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलं होतं. यावर हिंमत असेल तर मोदींनी निर्णय घेऊन साध्वी, हेगडे यांना बाहेर काढावं, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी गांधीजींसमोर नतमस्तक होतात. तर हेगडे गांधीजींची चेष्टा करतात, आरएसएसच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात गांधीजींबाबत किती द्वेष आहे हे ह्यातून स्पष्ट होतं, असं घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे.
हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा निषेध करतो. यावर नरेंद्र मोदींनी देशाचीच नाही तर संपुर्ण जगाची माफी मागावी, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गांधींजींचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं. तसेच अशा लोकांना भारतात महात्मा म्हणून कसं काय संबोधलं जातं?, असा अनंतकुमार हेडगे यांनी म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदी गांधीजींसमोर नतमस्तक होतात, तर हेगडे गांधीजींची चेष्टा करतात, आरएसएसच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात गांधीजींबाबत किती द्वेष आहे हे ह्यातून स्पष्ट होतं. @narendramodi @BJP4Maharashtra pic.twitter.com/mqDV8ah1zr
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
संभाजी राजेंची मालिका संपताना अमोल कोल्हे भावूक…. केला हा खास व्हिडीओ ट्विट!
भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीचा प्लॅन ठरला!
महत्वाच्या बातम्या-
हेगडे यांच्या वक्तव्यावर भाजपश्रेष्ठींनी माफी मागावी- बाळासाहेब थोरात
अमित शहांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास सुरु!
हिंदू स्त्रियांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे- विक्रम गोखले
Comments are closed.