Top News

“मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

मुंबई | पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केलेल्या वादग्रस्त पुस्तकावरून शिवरायांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पुस्तकाच्या लेखकावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच यावेळी बोलताना उदयनराजेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही. कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

होय शरद पवार हेच जाणता राजा. महाराष्ट्रात सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे, म्हणून अनेकजण त्यांचं बोट हातात घेऊन राजकारण करतो, असं म्हणत आव्हाडांनी उदयनराजेंना टोला लगावला.

दरम्यान, महाराजांच्या वारसांनी स्वत:ला शिवाजी महाराज समजण्याची कृपा करू नये, असा सल्लाही आव्हाडांनी दिला.

ठळक बातम्या-

“राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं”

“महंगाई जेब कांटे, भाजपा देश बांटे”

“किरकोळ लोकांच्या बोलण्याचा मला फरक पडत नाही, परत बोलाल तर लोक ताणून मारतील”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या