“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं”
मुंबई | जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारलं आहे. सध्या या स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेलं स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. भारतरत्न सरदार वल्लभ पटेल यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आलं होतं. मात्र आता ते नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव या स्टेडियमला दिल्यामुळे मोदी सरकारवर टीकेचा वर्षाव होत आहे.
गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हर्दिक पटेल यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची देखील ट्विट करत नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त केला आहे. आव्हाडांनी मोदींच्या या कृत्याची थेट तुलना हिटलरशी केली आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावानी मतं मागून थकल्यानंतर त्यांच्या नावानी उभे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतलं, हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असं म्हणत आव्हाडांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, गुजरात मध्ये उभारण्यात आलेलं हे स्टेडियम सरदार पटेल स्पोर्टस इन्क्लेव्हचा भाग आहे. या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम आणि मैदानात 11 खेळपट्या आहेत. आधुनिक अशा एलईडी लाईट्स देखील मैदानात बसवण्यात आल्या आहेत. जय शहा हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना या स्टेडियमची पुनर्बांधणी करण्यात आली होती. या स्टेडियमवर 1 लाख 10 हजार लोक सामना पाहू शकतात. शिवाय पावसाचे थेंब स्टेडियममध्ये येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतलेली आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…
हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2021
थोडक्यात बातम्या-
नॅशनल क्रश रश्मिका मंधना लवकरच बॉलिवूडमध्ये, उचललं हे मोठं पाऊल
उत्तर द्या ठाकरे सरकार!; पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं विचारले ‘हे’ 14 प्रश्न
शेतकरी तसेच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ऊर्जामंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
खेळासाठी कायपण… म्हणून ‘हा’ क्रिकेटपटू म्हणाला विमान नको, मी कारनेच जाणार!
“मी त्यांना वाघ म्हणणार नाही, संत म्हणतो… संत संजय राठोड लगे रहो!”
Comments are closed.