Top News

NRC विधेयकाविरोधात शपथ घेऊन जितेंद्र आव्हाडांनी दर्शवला कडाडून विरोध

मुंबई | संपूर्ण देशात NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मुद्दा चर्चेत असताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही विधेयकाला कडाडून विरोध दर्शविला आहे. मी धर्म,जात,पंथ यात कोणताही भेदभाव न करता माझ्या देशबांधवांच्या सोबत निर्धाराने उभा राहील, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

मी, डॉ.जितेंद्र सतीश आव्हाड, शपथ घेतो कि सत्याग्रहाच्या मार्गानं माझं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मी कोणतेही कागदपत्रं सादर करणार नाही. संविधानविरोधी अशा CAB आणि NRC धोरणांना विरोध करण्यासाठी मी धर्म,जात,पंथ यात कोणताही भेदभाव न करता माझ्या देशबांधवांच्या सोबत निर्धारानं उभा राहील, अशा शब्दात आव्हाडांनी NRC विधेयकावर टीका केली आहे.

काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. मात्र शिवसेना खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केल्यामुळं काँग्रेस नेते नाराज झालं असल्याचं दिसत आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला सोमवारी शिवसेनेनंही पाठिंबा दिला होता. शिवसेनेनं लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूनं मतदान करताच काँग्रेसमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या