बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा डोक्यावर पडलाय काय?, काय बोलतो याचं याला कळेना”

मुंबई | अस्पृश्यता निवारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान मोठं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे, असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. यावरुन वाद सुरु झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षेंवर निशाणा साधला आहे.

“हा डोक्यावर पडलाय काय?, काय बोलतो याचं याला कळेना”, असं म्हणत आव्हाडांनी बोचरी टीका केली आहे. पोंक्षेंच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनीही पोंक्षेंना लक्ष्य केले आहे. पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना पोक्षेंनी वरील वक्तव्य केलं होतं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय”

अहो..सरकार आणलं यांनी, ‘सामना’चं संपादकपद तरी द्यायचं होतं- रामदास आठवले

महत्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंची पाठराखण करत रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

“भाजप सरकार घालवण्याची जबाबदारी काँग्रेसलाच पार पाडावी लागेल”

…तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करू- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More