Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

तिथे मॅप बदलले जातायेत आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, आव्हाडांचा मोदींवर निशाणा

मुंबई | तिथे मॅप बदलत जात आहे, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ? कशाला ही धूळफेक?, असा सवाल आव्हाडांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

चीनविरोधात भारताने मोठं पाऊल उचलत चीनच्या 59 अ‌ॅपवर सरकारनं बंदी घातली आहे. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अ‍ॅप्लिकेशनचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, डेटा आणि गोपनीयतेच्या समस्यांमुळे भारत सरकारनं हे पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आव्हाडांच्या या टीकेनं राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार

कोरोना लसीच्या शोधात अमेरिका आघाडीवर; केलंय हे अचाट काम

‘देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय’, ‘डॉक्टर्स डे’निमित्त राजेश टोपेंचं डॉक्टरांना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या