बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा घणाघाती आरोप

पुणे | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पुण्यातील सारस बागेच्या शेजारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नागरिकत्व कायदा आणि संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी संविधानावरील हल्ला आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत.

सीएए कायदा आणून केंद्र सरकार संविधानातील मुल्यांचा भंग केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे आंबेडकर स्वीकारायचे की गोळवळकर हे देशानं ठरवायचं आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान,  सीएए विरोधात बोलताना इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्र विकास आघाडी लवकरच करणार 60 ते 70 हजार पदांची भरती!

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग

महत्वाच्या बातम्या-

“नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!

तुम्ही अ‌ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More