बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संभाषणाची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?”; आव्हाड संतापले

मुंबई | महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतलाय.

उगाचच भारतीय राज्य घटनेने दिलेले स्वातंत्र्य तुमच्या हाताने गळा घोटू नका. कोणालाही ते आवडत नाही. कोणी काय खावं कोणी काय घालावं आता कोणी काय बोलावं हे पण तुम्ही ठरवणार का?, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय.

थोडक्यात बातम्या- 

नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यांवरून सांगितले 5 संकल्प, म्हणाले…

‘स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली मी पहिली व्यक्ती ज्याला…’, पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

तळागाळातील जनता समृद्ध व्हावी हेच महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं- नरेंद्र मोदी

देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More