मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शहापूर दौऱ्यावर होते. यावेळी आदिवासी पाड्यावर शरद पवार यांनी आव्हाडांच्या साथीने गरमागरम मटनावर ताव मारला. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आव्हाडांची खिल्ली उडवली होती. त्यांना आव्हाडांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.
सोमय्याजी, आदिवासी बांधव आजही मटन खातात. आपण आदिवासींना इतकं गरीब समजता की त्यांच्या आवडीचं जेवण ते पाहुण्यांना खाऊ घालणार नाहीत. आदिवासींच्या गरीबीची कृपया चेष्टा करू नका, असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावला आहे.
दरम्याम, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांचं आदिवासींच्या झोपडीत जेवण… कोंबडीचा रस्सा, भाकरी आणि ‘बिसलेरीचे पाणी’ वाह भाई वाह.. असं ट्वीट करत सोमय्यांनी आव्हाडांची खिल्ली उडवली होती.
शहापूरच्या आदिवासी पाड्यावर रामचंद्र खोडके यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जेवण केलं. यासंदर्भातले फोटो आव्हाडांनी ट्वीट केले होते.
NCP leaders Sharad Pawar & Minister Jitendra Awhad Lunch at Adiwasi’s House ” Chicken, Roti & ‘Bisleri Bottle Water’!!!?
शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांचं आदिवासी चा झोपडीत जेवण कोंबडीचा रस्सा, भाकरी आणि
“बिसलेरी चे पाणी” वाह भाई वाह[email protected] @Awhadspeaks @NCPspeaks pic.twitter.com/q3y5fJuVCH— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“कुडाची झोपडी अन् आदिवासी मावशीचा स्वयंपाक, काय म्हणावं या नेत्याला”
सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारवर स्तुतीसुमने
महत्वाच्या बातम्या-
डीपनेकवरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रियांकाच्या आईचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे
अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रूपयांचा झटका!
Comments are closed.