बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोरोनाशी लढतोय, तरीही धीरोदत्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या लॉकडाऊन करणार नाही पण परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा दिला. यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत. सलाम, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी इतर देशांनी कोरोनाकाळात जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती देत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही, बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून, असा टोला आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?”

मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं

“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”

रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल

पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More