बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर भाजप आम्हाला लांब नाही”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

मुंबई | गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेला (Shivsena) उद्देशून अनेक टोले लगावले आहेत. तर आव्हाडांनी भाजपविषयी (BJP) केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

‘मोठा भाऊ म्हणून आदर करू,मात्र बोलायचं एक आणि करायचं एक हे खपवून घेतलं जाणार नाही’, असं वक्तव्य आव्हाडांनी शिवसेनेला उद्देशून केलं आहे. तर भाजप आम्हाला फार लांब नाही, असा सूचक इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

‘आम्ही आघाडी (Mahavikas Aghadi) धर्म पाळून विरोधी पक्षातील भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्हीच शत्रुत्व का घ्यायचं?’, असा खोचक सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी सेनेला उद्देशून उपस्थित केला आहे.

दरम्यान, राजकारणातील (Politics) गणितं कधीही बदलू शकतात, असं सूचक वक्तव्य देखील आव्हाडांनी केलं आहे. ‘मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत’, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

फक्त ‘या गोष्टीवर’ बंदी आणा; वानखेडे दांपत्याची न्यायालयात धाव

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका”

पतीला गर्लफ्रेंडसोबत असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं; पत्नीनं भररस्त्यात दोघांना…

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

अण्णा भाऊ साठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये मला काहीही फरक दिसत नाही- मोहन भागवत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More