मुंबई | राहुल गांधींजी तुम्ही काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करा. आता वेळ आहे आणि पक्षालाही तुमची सध्याच्या काळात सगळ्यात जास्त गरज आहे, अशी कळकळीची विनंती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केली आहे.
तुम्ही दिलेल्या राजीनाम्यामुळे आणि त्यावर पुनर्विचार करण्यास नकार दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मी प्रचंड दुखा:त आहे आणि मला त्रासदेखील होत आहे, असं आव्हाड म्हणाले आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.
सोनिया गांधींचं वाढतं वय आणि तब्येतीची अडचण या गोष्टी असूनदेखील त्या काँग्रेसला पुन्हा एकदा सुवर्णकाळ आणून देतील यात तिळमात्र शंका नाहीये. मात्र तुम्ही एक जाणते आणि संवेदनशील नेते आहात. तुन्ही सध्याच्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊ शकता, असं आव्हाड म्हणाले आहेत.
काँग्रेस विचारसरणीचा पाईक म्हणून मी आपणाला पत्र लिहित आहे. तुम्ही या पत्रावर विचार करावा, असंही आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं रोखठोक प्रत्युत्तर!
-“…तर भारत बालाकोट एअर स्ट्राईकहून मोठा हल्ला पाकव्याप्त काश्मिरमध्ये करेल”
-शरद पवारांचा ‘हा’ अत्यंत विश्वासू सहकारी राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत?
-मुख्यमंत्र्यांविरोधातील काँग्रेसची पोलखोल यात्रा ‘या’ कारणामुळे लांबणीवर
-“विरोधी पक्षातील 5 ते 6 सहा आमदार माझ्या संपर्कात; लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार”
Comments are closed.