ठाणे | छत्रपती शिवाजी महारांचा उल्लेख करत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान देखील राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक युद्द रंगलेलं पाहायला मिळालं.
याबद्दल बोलताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे.कार्यक्रमात काय झालं मला माहित नाही. राज्यपालांबद्दल मोदी काय म्हणाले मला माहित नाही, मी पाहिलं नाही. परंतू त्या राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस झाला. मोदींच्या मनात असेल तर त्यांच्यासाठी हे फोनवरून एका मिनिटाचं काम आहे, अशी खोचक टीका आव्हाडांनी केली.
ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खरंच प्रेम असेल, तसेच राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं वाटत असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात असेल तर राज्यपालांना काढायला मोदींसाठी एका फोनचं काम आहे, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. राज्यपालांंच्या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांना पदावरून हटवायला एक फोन बस झाला म्हणत जितेंद्र आव्हाडांनी राज्यपालांना टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज
“निकाला आधीच मी येणार, मी येणार सांगत होते, पण आम्ही काय येऊ देतो”
“हिंदूह्रदयसम्राटाची पदवी बाळासाहेबांनंतर देवेंद्र फडणवीसांना देण्यात यावी”
नारायण राणेंच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ प्रकरणी मुंबई महापालिकेनं 7 दिवसात उत्तर मागवलं
सर राॅकस्टार जडेजा! तब्बल 49 वर्षांनी ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर
Comments are closed.