जितेंद्र आव्हाडांची बाबासाहेब पुरंदरेंवर टीका, म्हणाले…
मुंबई | पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात 23 जुलै रोजी डॉ. श्रीमंत कोकाटे (Dr. Shrimant Kokate) लिखीत शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी डॉ. जयसींगराव पवार (Dr. Jaysinghrao Pawar) आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी भाषणात शरद पवारांनी दिवंगत शिवशाहिर बळवंत पुरंदरे (Balwant Purandare) तथा बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आजवर पुरंदरे यांच्या इतका अन्याय कोणीच केला नव्हता, असं पवार म्हणाले होते.
या प्रकाशनानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यात आता राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुरंदरे यांच्याच एका भाषणाचा दाखला देत त्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाण विकृत आहे. त्यांनी महाराजांची बदनामी केली. यावरुन महाराष्ट्रातील कोणाच्या मनात दुमत असता कामा नये, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पुढे बोलताना त्यांना त्यांच्या एका भाषणाच हवाला दिला. 1969 – 70 साली स. वा. जोशी विद्यालयाच्या पटांगण, डोंबिवली या ठिकाणी शिवव्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी पुरंदरे यांनी भाषण दिलं. त्यात ते म्हणाले, शिवाजी महाराज गुडगी रोगाने वारले. हा असा रोग आहे, की ज्याला जाहीरपणे बोलूही शकत नाही. त्यामुळे शिवाजी महाराज गुडगी रोगाने वारले अशी अफवा आजही महाराष्ट्रात सुुरु आहे, असं आव्हाड म्हणालेत.
त्याकाळी शिवाजी महाराजांवर लिखाण करणारे ब. मो. पुरंदरे (B. M. Purandare) हे एकटेच होते. त्यामुळे त्यांनी लिहिलेला इतिहास लोकांपर्यंत पोहोचला. जेव्हा बहुजन जेम्स लेनच्या (James Lane) लिखाणानंतर लोकांनी शिवाजी महाराजांवर लिखाण सुरु केलं. बखरींचा अभ्यास सुरु झाला. त्यामुळे महाराजांचा मृत्यू गुडगी रोगाने झाला असंच आजपर्यंत लोकांना वाटत आलं. हा गुडगी रोग काय? त्याचे कोणते पुरावे आहेत? हे फक्त पुरंदरेंनाच माहित होतं, असंही ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या –
राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो?, वाचा सविस्तर
अविवाहितेच्या मुलांना फक्त आईचं नावही लावता येणार, ‘या’ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
‘या’ आर्युवेदिक उपायाने झटपट वजन कमी करा, वाचा सविस्तर
कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, बाळाचं नावंही आहे अगदी खास; पाहा फोटो
निता अंबानींकडून नीरज चोप्राचं अभिनंदन, तरीही सोशल मीडियावर झाल्या ट्रोल
Comments are closed.