बीड | इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये संविधान बचाव सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आव्हाडांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाट आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हेही उपस्थित होते.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन आव्हाडांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सीएए आणून सरकार संविधान विरोधी काम करत आहे, अशी टाका त्यांनी केली आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आव्हाडांकडे यासंबंधीचा खुलासा मागणार असल्याचं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शिवभोजनासाठी भलीमोठी रांग; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा बंदोबस्त
“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”
महत्वाच्या बातम्या-
‘इंद्रायणी थडी’त होणार रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण!
सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा निर्णय
देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात- निवृत्त न्यायाधीश
Comments are closed.