Top News महाराष्ट्र मुंबई

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती- जितेंद्र आव्हाड

मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. अशातच दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे.

‘भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही’ असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती, असं म्हणत आव्हाडांनी टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

बुधवारी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचार सुनावणी प्रकरणात भाजप नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर अजून एफआयआर का दाखल नाही, असं विचारत पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते. त्यांनतर त्यांची एका दिवसात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, न्या. मुरलीधर यांच्या बदलीमुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करणे सुरु केले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारचा भाजपला पुन्हा धक्का; भाजपच्या बड्या नेत्याची नियुक्ती रद्द

“वीर सावरकरांची ढाल! भाजपचा पुळका खोटा”; ‘सामना’तून भाजपवर बाण

महत्वाच्या बातम्या- 

फक्त दहा रुपये भरा, पीएमपीचा प्रवास दिवसभर करा!

स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या ‘संघ’ परिवाराचे योगदान काय?- शिवसेना

“वारिस पठाणांच्या वक्तव्यामुळे दिल्ली पेटली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या