बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…हा तर महाराष्ट्राचा अपमान”; जितेंद्र आव्हाड मंगेशकर कुटुंबियांवर बरसले

मुंबई | राज्यात समाजकारण, राजकारण असो की अन्य कोणतीही क्षेत्र असो कशावरूनही वाद सुरू होऊ शकतो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत पार पडला. आता यावरूनही वाद सुरू झाला आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर आरोप केला आहे.

पुरस्कार सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या पुरस्काराचे मानकरी असल्यानं उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. परिणामी आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर राज्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. पहिलाच पुरस्कार सोहळा वादामुळं देखील गाजत आहे.

लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. परिणामी वादाला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, मंगेशकरांच्या नावानं पुरस्कार दिला जात असताना राज्यातील दिग्गज नेते उपस्थित नसल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई विमानतळावर उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या – 

“लतादीदी मला नेहमी म्हणायच्या माणूस आपल्या वयानं नाही तर…”, नरेंद्र मोदी भावूक

“माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं…”, सचिनला लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; पाहा व्हिडीओ

भाजप नेत्यांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी तर फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतूक, म्हणाले…

“…नाहीतर उद्या कुणीही सुरक्षित राहणार नाही”

“कोण हा फडतूस रवी राणा?, प्रश्न जर सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More