Mumbai | यंदाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून तुफान आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे??? एक दिवस अजित पवार आलेत आणि शरद पवार यांना त्यांनी धक्का मारून बाहेर काढलं… जाताजाता त्यांच्या हातातलं घड्याळही घेऊन गेले… ही पाकीटमारांची टोळी आहे, असं म्हणत अजित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे.
जितेंद्र आव्हाड भडकले
मर्दाची औलाद असते तर म्हणाले असते की, शरद पवार यांनी तुतारी निशाणी घेतली, मी सुद्धा एखादं वेगळं चिन्ह घेतो. असं केलं असतं तर मानलं असतं की, तुम्ही मर्दाची औलाद आहात…, असंही पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
तुमच्यात हिंमत होती , अजित पवार मर्द की औलाद होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतली. मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्याला मर्द म्हणतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी ती चोरून माझी पार्टी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
शरद पवार मोदींसमोर नाही झुकले, शरद पवार आमच्यासमोर म्हणाले होते की, तुम्हाला जायचं असेल तर जा, मी एकटा राहिलो तर चालेल… मी तरुणांमधून पुन्हा नेतृत्व तयार करेल, असं शरद पवार यांनी त्यावेळी म्हटल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि आरएसएसच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना नथुराम गोडसेची औलाद म्हणत देशात अमन आणि शांती बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमची विचारधारा सेम’; ‘या’ व्हिडीओमुळे पार्थ पवार होतायेत ट्रोल
भाऊबीजेला लाडक्या बहीणींसाठी गिफ्ट शोधताय?, मग ‘इथे’ मिळेल ट्रेंडी ऑप्शन
श्रीनिवास वनगा यांच्यानंतर शिंदे गटाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल!
देवेंद्र फडणविसांच्या जीवाला धोका?, सुरक्षेत करण्यात आली मोठी वाढ
शरद पवारांचा महायुतीवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले..