बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महेश मांजरेकर कोण आहेत?’; जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई | दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचं जाहीर केलं आहे.

वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचं धाडस केलं नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त गोडसे सिनेमाची घोषणा केली आहे, असं त्यांनी म्हटलंय.

नथुराम गोडसेची गोष्ट नेहमीच माझ्या ह्रदयाच्या जवळ राहिली आहे. अशा पद्धतीच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धाडस लागतं. मी नेहमीच कठीण विषय आणि गोष्ट सांगताना कोणतीही तडजोड करु नये यावर विश्वास ठेवला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी याव्यतिरिक्त लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाहीये किंवा विरोधात बोलायचं नाहीये. कोण चूक कोण बरोबर हा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत, असंही महेश मांजरेकरांनी म्हटलंय.

या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या चित्रपटावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरुन आक्षेप नोंदवला आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

“विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज”

‘…तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

IPL 2021: एकाच दिवशी मुंबईला दोन धक्के, सामना तर गमावलाच पण…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने दिली महत्वाची माहिती

सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही- पीयूष गोयल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More