काय उत्तम रित्या परतफेड केलीत; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आव्हाडांची चपराक

मुंबई | विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. मात्र आघाडीतले काही नाराज नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. याच नेत्यांवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

काय उत्तम रित्या परतफेड केलीत…. ‘गद्दारीने परतफेड’ हे इतिहासात नवीनच आहे, अशी उपरोधिक आणि तितकीच संतापजनक प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

पक्ष सोडताना सचिन अहिर, चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी शरद पवार यांचे अनंत उपकार आहेत. त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही अश्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या याच प्रतिक्रियांचा आव्हाडांनी खरपूस समाचार घेतला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पक्षांतरावर मौन सोडलं. जे गेलेत त्यांना जाऊ द्या. आपण तरूणांना संधी देऊ, असं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-‘हा’ आमदार म्हणतो काहीही होऊदे मी मात्र पवारांसोबतच!

-शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्र्यांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

अल्पवयीन मुलीसोबत सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच; न्यायालयाचा निर्णय

-पती पत्नीने जिद्दीने एकत्र अभ्यास केला अन् राज्यसेवा परिक्षेत मिळवला पहिला, दुसरा क्रमांक

-चालू परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे- शरद पवार