मुंबई | गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. ‘मला माफ करा मी हरलो’ या मथळ्याखाली आव्हाडांनी पोस्ट लिहिली आहे. अनंत करमुसे प्रकरणाचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
करमुसेने केल ते एकदम बरोबर केलं. माझे अर्धनग्न चित्र फेसबुकवर टाकलं. 2017 सालच्या पोस्टमध्ये तो साहेबांना शरदुद्दीन म्हणतोय. एकदम चांगल काम करत होता. सगळ्यांच्या समोर व्हिलन जितेंद्र आव्हाड. मला समजत नाही की सगळ्यांना मी एवढा का खूपतो?, असा सवाल आव्हाडांनी केला आहे.
मी चूक काय केली 80 हजार लोकांना खिचडी वाटली. त्यांच्यासाठी दारोदारी फिरुन त्यांना शांत करणं, त्यांना तुम्ही घरी जा, घरात बसा म्हणून सांगणं, संध्याकाळी रात्री ज्या वस्तीत लोक ऐकत नाही त्यांना पोलीसांसोबत जाऊन सांगणं आणि त्यानंतर ती वस्ती शांत होणं. ही माझी चूक होती का?, असंही आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, जगाला माहीत नसलेला जितेंद्र आव्हाड दाखवण्याची मला सवय ही नव्हती. पण एक व्हिलन जितेंद्र आव्हाड दाखवण्याचं काम गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जणांनी यशस्वीरित्या करुन दाखवलं. म्हणून तुमची माफी मागतो मला माफ करा, अशा शब्दांत आव्हाडांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मला माफ करा मी हरलो…@supriya_sule @PawarSpeaks@AUThackeray @Jayant_R_Patilhttps://t.co/aMyE5rMi6u
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 15, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल
भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…
महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजारांच्या जवळ
जगातील ‘हे’ 15 देश कोरोना फ्री, आत्तापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही
“महापुरात आम्हाला वाचवलं, महामारीत तुम्हाला वाचवू”
Comments are closed.