Top News महाराष्ट्र मुंबई

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या लेखांची मालिका गेली 27 दिवस गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड लिहित आहेत. आज या मालिकेतला 27 वा लेख आव्हाडांनी लिहिला आहे. ‘साहेब माझे विठ्ठल’ या शिर्षकाखाली राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा या क्षेत्रांतला पवारांचा वावर यावर आव्हाड बोलते होत आहेत. आजच्या लेखातून महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड कशी झाली अन् शरद पवारांनी त्यात कशी भूमिका बजावली याचं गुपित आव्हाडांनी सांगितलं आहे.

जितेंद्र आव्हाड फेसबुक पोस्टमध्ये लिहितात-

“2008 चा तो काळ होता.BCCI चे अध्यक्ष होते पवार साहेब. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता.त्यावेळी संघाचा कर्णधार होता आपल्या सर्वांचा आवडता खेळाडु राहुल द्रविड.पवार साहेब देखील Bcci अध्यक्ष या नात्याने आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर होते.

दौरा सुरू असताना एक दिवस अचानक राहुल द्रविड पवार साहेबांना भेटायला आला.साहेब ब्रेकफास्ट करत बसले होते.साहेबांनी द्रविडच स्वागत केलं आणि अचानक येण्याचं प्रयोजन विचारलं.द्रविड साहेबांना, “मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा..!” असे म्हणाला. चालु दौऱ्यात द्रविड सारखा खेळाडू अशी मागणी करतोय हे पाहून साहेबांना नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसला. यावर साहेबांनी द्रविड ला विचारले की, “इंग्लंड दौरा सुरू असताना,आणि या दौऱ्यावर तू कॅप्टन असताना असा तडकाफडकी निर्णय कसा घेता येईल..? दुसरं म्हणजे हे निर्णय मी घेत नाही.यासाठी तू निवडसमितीकडे जायला हवं..कारण हा निर्णय पूर्णतः निवड समितीचा असतो…!”

तरीदेखील द्रविडने साहेबांकडे,”मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळीक द्या,माझ्या व्यक्तिगत कामगिरीवर या जबाबदारीमुळे परिणाम होतो” हा धोशा कायम ठेवला. तो ऐकत नाही म्हटल्यावर साहेबांनी द्रविडला पर्यायी कर्णधाराच नाव सुचवायला सांगितले.द्रविडणे यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच नाव साहेबांना सुचवलं. साहेबांनी मग सचिनला कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल विचारलं.सचिनने देखील कामगिरीच कारण देत कर्णधारपद स्वीकारण्यास प्रांजळपणे नकार दिला.
दौरा सुरू होता आणि या दौऱ्यात संघाचे दोन्ही दिग्गज खेळाडू कर्णधारपदासाठी तयार नव्हते.शेवटचा उपाय म्हणून साहेबांनी मग त्या दोघांनाच योग्य व्यक्तीच नाव सुचवायला सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे दोघांनी मिळून एकच नाव घेतले. ते नाव होत महेंद्रसिंग धोनी.

साहेबांनी यावर विचार केला. सचिन आणि द्रविड सारखे खेळाडू धोनी च नाव घेतायत म्हटल्यावर साहेबांनी मोठ्या विश्वासाने हे नाव निवडसमितीला सुचवलं. दिलीप वेंगसरकर त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते.धोनीच्या नावावर सचिन ,राहुल आणि खुद्द Bcci अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती.निवड समितीने धोनीला कर्णधार बनवत असल्याचा निर्णय जाहीर केला..! पुढे याच महेंद्रसिंग धोनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात इतिहास घडवला.”

महत्त्वाच्या बातम्या-

पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य सांगणाऱ्या या गाण्याचे गृहमंत्र्यांकडून अनावरण

“मुख्यमंत्री घरी बसून काळजीपूर्वक काम करत आहेत, आम्ही सर्व त्याचे साक्षीदार”

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रुग्ण!

नागपूरकरांवर तब्बल 3 हजार सीसीटीव्हींची नजर, कनेक्शन असणार मुंढेंच्या केबिनमध्ये!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या