बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वॉचमनला जेवण किंवा मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी फुकटच्या सूचना करू नये”

मुंबई | ज्यांनी आपल्या वॉचमनलाही जेवण दिलं नसेल किंवा या अडचणीच्या काळात आपल्या मोलकरणीलाही जेवण दिलं नसेल त्यांनी नको त्या  फुकटच्या सूचना करू नये, असं राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड क्वारंटाईन झाल्यावर अनेक वेगळ्या पद्धतीच्या चर्चांना उधाण आलं.  त्यामुळे साऱ्या शंकांना उत्तर देण्यासाठी  त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड क्वारंटाईन गेले कारण त्यांच्या अमुक नोकरामुळे किंवा तमूक पोलिसामुळे त्यांना संसर्ग झाला असल्या कुचाळक्या करणाऱ्या, टवाळखोर बातम्या चघळणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मला खरोखर संताप येतो. मुळात, कुणालाही असा दुर्धर आजार होणं ही काय गॉसिप करायची गोष्टी आहे? तुमच्यातल्या मानवी संवेदना पार संपल्या का? की पेपर खपवण्यासाठी यांनी त्या गहाण टाकल्या?, असं म्हणत आव्हाडांनी क्वारंटाईन गेल्यावर काहीही प्रश्न विचारणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

जर या चाचण्या झाल्या नसत्या तर हा आजार किती पसरला असता याची कल्पनाच न केलेली बरी. मी काही फार मोठा तीर मारला असा माझा दावा नाही. एक सामाजिक जाणीव म्हणून मी हे केलं. मंत्रिमंडळातील माझे सहकारी मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ठाण्यातील तमाम पत्रकारांच्या चाचण्या करून घेतल्या. जे मी केलं ते उद्या धनंजय मुंडे साहेब सुद्धा करणार आहेत. कारण ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपल्या माणसांची आपण काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार, असं आव्हाडांनी  म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्या सतत संपर्कात असणारी एक व्यक्ती कोरोनाबाधित आहे हे कळल्यानंतर मी स्वतः डॉक्टरी सल्ल्यानुसार क्वारंटीनमधे गेलो. माझी चाचणी निगेटिव्ह आली असली तरी सात दिवसांनी होणाऱ्या दुसऱ्या चाचणीपर्यंत आणि त्यानंतर डॉक्टरांनी अनुमती देईपर्यंत मी घराबाहेर पडणार नसल्याचं आव्हाडांनी सांगितलं.

आव्हाडांची फेसबुक पोस्ट-

ट्रेंडिंग बातम्या-

धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश टाकणाऱ्यासह दहा ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल

‘लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्यांच्या अन्न-सुरक्षेची काळजी घ्या’; सोनियांचं मोदींना पत्र

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींनी सांगितली सप्तपदी… नागरिकांना सूचना पाळत साथ देण्याचं केलं आवाहन

देशभरातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

अन्य देशांच्या तुलनेत भारताने लवकर पावलं उचलली म्हणूनच भारत मोठ्या संकटापासून वाचला- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More