“खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत?”;जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Jitendra Awhad | छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांची वाघनखं ही लंडनहून आणणार असल्याचं सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून मोठा दावा केला आहे.

“लंडनहून आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची नसावीत.  ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही. खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेली नाहीत,” असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले आहेत.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपवर टीका केली. तसेच त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. त्या ट्विटच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला भावनिक राजकारण करण्याची सवय असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं ट्विट जसंच्या तसं

जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत लिहिलं की, “अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती’, अशी घोषणा सरकारनेच करून टाकली. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, ” म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही.” म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका !”, असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केलं.

“महाराष्ट्राची फसवणूक असून महाराजांचा अपमान”

जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट महाराजांची नाही असं एक मंत्री बोलत होते. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. वाघनखांसाठी जे संग्रहालय करण्यात येणार आहे त्यासाठी 8 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. 30 कोटींचा खर्च हा केवळ तीन वर्षांसाठी असणार आहे. त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना देण्यात येणार आहे. ही महाराष्टराची फसवणूक आहे. शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले आहेत.

News Title – Jitendra Awhad First Reaction After Indrajeet Sawant Claim

महत्त्वाच्या बातम्या

..अन् अभिनेत्रीने थेट सलमान खानच्या कानाखाली लगावली; नेमकं असं काय घडलं होतं?

मुंबईतील मुसळधार पावसानंतर अजित पवारांचं ट्विट; म्हणाले,”हवामान बदलामुळे..”

नवी मुंबईतील रेल्वेरूळावर घडली धक्कादायक घटना, महिलेच्या पायावरून थेट….

मुंबईकरांनो जरा बचके! हवामान खात्याचा हायअलर्ट, पुढील 24 तास..

रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटकांची उडाली तारांबळ; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO