Top News

“हात होता म्हणून निवडून आले, हात काढला तर पडले”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु असतानाच छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात ‘जाणता राजा’ यावरुन वाद सुरु आहे.

घड्याळ घालणाऱ्यांनो तुमची वेळ संपत आली आहे, असं उदयनराजे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यावर आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यावर हात होता म्हणून निवडून आले, हात काढला तर पडले, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उदयनराजेंवर पलटवार केला आहे.

उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन ‘जाणता राजा’ मुद्द्यावरुन शरद पवारांना टोला लगावला. त्यांच्या प्रतिक्रियेवर जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार ‘जाणता राजा’च आहेत असं सांगून उदयनराजेंवर टीका केली आहे.

होय, शरद पवार हेच जाणता राजा. महाराष्ट्रात सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे. म्हणून अनेकजण त्यांचं बोट हातात घेऊन राजकारण करतो, असं म्हणत आव्हाडांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या