शिवसेना-राष्ट्रवादीत चाललंय काय? मातोश्रीवर आव्हाड-ठाकरे भेट

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेनं भाजपसोबत युती करू नये, यासाठी आव्हाडांनी ठाकरेंची भेट घेतली असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईत होत आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या अगोदर जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात काय चर्चा झाली आणि या भेटीमागचं कारण काय याबाबत, अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र उद्धव ठाकरेंची ही सदिच्छा भेट होती, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुकाराम मुंढेंचा अधिकाऱ्यांना दणका; 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई

-…म्हणून पुढील 48 तास जगभरातील सर्वांचं इंटरनेट बंद राहण्याची शक्यता!

-मुंबई सेंट्रल टर्मिनसला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं; आठवलेंची मागणी

भाजप सत्तेत आल्यास 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करु, आश्वासनाचं काय झालं?

-#MeToo | मराठीत Black Rose चळवळ

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या