Top News

“हिंमत असेल तर अनाधिकृत हॉटेलं तोडून दाखवा”

मुंबई | गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीरारोड मधील मेळाव्यात माजी आमदार नरेंद्र मेहतांवर हल्लाबोल केलाय. कोणाला खुश करण्यासाठी आयुक्त जर काम करत असतील तर गाठ आमच्याशी आहे असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो, माजी आमदाराच्या 711 क्लब, सी एन रॉक हॉटेलवर कारवाई करा. डॉ. विजय राठोड तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि कर्तव्य कठोर आहात तर ती बांधकामं तोडा. मात्र कोणाची त्यावर कारवाई करण्याची आणि बोलण्याची हिंमत नाही.”

आव्हाड पुढे म्हणाले, “आमच्या एका कार्यकर्त्याचे हॉटेल अनधिकृत 3 वेळा तोडलं. माझ्याकडे असलेली 124 अनधिकृत हॉटेलांची यादी जाहीर करतो हिंमत असेल तर त्यातील 24 तोडून दाखवावी.”

“पालिकेतील अधिकारी एका पक्षाचे असल्यासारखं वागतायत. कोण अधिकारी किती वर्ष कुठल्या पदावर बसून आहे तसंच कशात भ्रष्टाचार झाला आहे याची संपूर्ण यादी आम्ही खिशात घेऊन फिरतो. आम्हाला आमचे काम करू द्या तुमची तुमचे काम करा,” असंही आव्हाड यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई- विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांचा दंड!

मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी

विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!

‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या