धक्कादायक!!! जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर, श्याम मानव हिटलिस्टवर

मुंबई | आमदार जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर, अंनिसचे प्रा. श्याम मानव, रितू राज हे नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या रडारवर होते, असा गौप्यस्फोट एटीएसने उच्च न्यायालयात केला आहे. 

आरोपींच्या चौकशीतून ही माहिती मिळाली असल्याची माहिती एटीएसनं दिली आहे. घाटकोपर येथून अटक केलेला पाचवा आरोपी अविनाश पवारच्या केस डायरीतून ही नावे समोर आली आहेत.